बॉम्बस्फोटाची खोटी माहिती देणाऱ्यावर गुन्हा

बॉम्बस्फोटाची खोटी माहिती देणाऱ्यावर गुन्हा

मुंबई, ता. २ : उद्योगपती मुकेश अंबानी, महानायक अमिताभ बच्चन आणि ज्येष्ठ अभिनेते धर्मेद्र यांच्या घराबाहेर बॉम्बस्फोट होणार असल्याची खोटी माहिती नागपूर येथील हेल्पलाईन ११२ क्रमांकाला मिळाली होती. याप्रकरणी शिवाजी पार्क पोलिसांनी एका व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला. याप्रकरणी स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखा अधिक तपास करीत आहे.
‘नागपूर ११२’ या हेल्पलाईनवर मंगळवारी (ता. १) दुपारी पावणेचारच्या सुमारास राजेश कडके नामक व्यक्तीने दूरध्वनी केला. या वेळी त्याने मुंबईतील शिवाजी पार्क येथे नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. त्यातील २५ नागरिकांकडे बंदुका आणि बॉम्ब असून ते मुकेश अंबानी, धर्मेंद्र आणि अमिताभ बच्चन यांच्या घराजवळ स्फोट करू शकतात असे सांगितले. त्यानंतर तात्काळ याबाबतची माहिती मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला देण्यात आली; परंतु पोलिस तपासात ही माहिती खोटी असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे अफवा पसरवून भीतीचे वातावरण निर्माण केल्याप्रकरणी शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com