बेकायदा टेलिफोन एक्स्चेंजचा पर्दाफाश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बेकायदा टेलिफोन एक्स्चेंजचा पर्दाफाश
बेकायदा टेलिफोन एक्स्चेंजचा पर्दाफाश

बेकायदा टेलिफोन एक्स्चेंजचा पर्दाफाश

sakal_logo
By

मुंबई, ता. २ : परदेशातून येणारे फोन विनापरवानगी थेट लोकल फोनसेवेवर वळवून मोबाईल कंपन्या आणि सरकारचे आर्थिक नुकसान करणाऱ्या बेकायदा टेलिफोन एक्स्चेंजचा महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) छडा लावला आहे. एटीएसच्या पथकाने नागपाडा परिसरात छापा टाकून एका तरुणाला ताब्यात घेतले आहे.
अटक करण्यात आलेल्या तरुणाने हे बेकायदा एक्स्चेंज चालवण्यासाठी बनावट कागदपत्रांच्या आधारे पन्नासपेक्षा अधिक सिम कार्ड घेतल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, या फोन क्रमांकांची कुठेच नोंद होत नसल्याने त्याचा समाजविघातक कृत्यांसाठी वापर होत असल्याची भीती व्यक्त होत आहे.
हा तरुण आग्रीपाडा येथील एक झेरॉक्स सेंटरमधून रिचार्ज करीत असल्याचे समजले. पोलिसांनी झेरॉक्स सेंटर चालवणाऱ्यास ताब्यात घेतले. त्याच्याकडून मोहम्मद इद्रिस अन्सारी या तरुणाबाबत माहिती मिळाली. हा तरुण स्वतःच्या मोबाईल क्रमांकाबरोबर जवळपास ५० जणांचे मोबाईल रिचार्ज करीत असल्याचे त्याने सांगितले. या माहितीच्या आधारे पथकाने टेलिफोन प्राधिकरण, सायबरतज्ज्ञ यांना सोबत घेऊन मदनपुरा परिसरातील अजमल हाइट्स या इमारतीच्या २० व्या मजल्यावर छापा टाकला.
...
फोनची झाडाझडती
सिमबॉक्स, राऊटर्स, तसेच इतर वेगवेगळ्या माध्यमांतून अन्सारी याने बेकायदा टेलिफोन एक्स्चेंज थाटल्याचे निदर्शनास आले. इद्रिस अन्सारी हा इंटरनेट, तसेच वेगवेगळ्या अॅपच्या माध्यमातून परदेशातून येणारे फोन मोबाईल कंपन्यांच्या सर्व्हरवर जाऊ न देता थेट वळवत होता. यामुळे मोबाईल कंपन्यांचे आर्थिक नुकसान होत होते. अन्सारी याच्या विरोधात नागपाडा पोलिस ठाण्यात फसवणूक, तसेच इतर कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. अन्सारी याच्या बेकायदा एक्स्चेंजवर आलेल्या फोनची ‘एटीएस’कडून झाडाझडती घेतली जात आहे.