Sun, June 4, 2023

दोन सराईत गुन्हेगारांवर स्थानबद्धतेची कारवाई
दोन सराईत गुन्हेगारांवर स्थानबद्धतेची कारवाई
Published on : 2 March 2023, 1:58 am
ठाणे, ता. २ (वार्ताहर) : वर्तकनगर आणि कासारवडवली पोलिस ठाण्यांच्या हद्दीत गुन्हे करून दहशत माजवणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांवर ठाणे पोलिसांकडून एमपीडीएअंतर्गत कारवाई करण्यात आली. त्यांची रवानगी कारागृहात करण्यात आली. सागर ऊर्फ रूपेश सीताराम दळवी (वय २८, रा. पाटील वाडी, सावरकर नगर) याच्यावर वर्तकनगर पोलिस ठाण्यात चार गंभीर गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी एक वर्षाकरिता स्थानबद्ध (एमपीडीए) अंतर्गत कारवाई करत त्याला एक वर्षाकरिता पुण्यातील येरवडा कारागृहात पाठवण्यात आले. कासारवडवली पोलिस ठाण्याच्या हद्दीत सहा गंभीर गुन्ह्याची नोंद असलेला सराईत गुंड योगेश परशुराम कारखानीस (वय ३५, रा. ओवळा, घोडबंदर रोड) याच्यावर स्थानबद्धतेची कारवाई करत त्याची नाशिक कारागृहात रवानगी करण्यात आली.