पोलिस हवालदार १८ हजारांची लाच घेताना अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पोलिस हवालदार १८ हजारांची लाच घेताना अटक
पोलिस हवालदार १८ हजारांची लाच घेताना अटक

पोलिस हवालदार १८ हजारांची लाच घेताना अटक

sakal_logo
By

डोंबिवली, ता. २ : कल्याण तालुका पोलिस ठाण्यातील हवालदार धनंजय फर्डे याला १८ हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी (ता. २) अटक केली. पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील आरोपींविरोधात कारवाई न करण्यासाठी त्याने लाच मागितली होती.

टिटवाळा येथील कल्याण तालुका पोलिस ठाण्यात धनंजय फर्डे हा कार्यरत असून पोलिस ठाण्यात तीन महिलांवर प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात अटकेची कारवाई होऊ नये यासाठी फर्डे याच्याकडे आरोपी महिलेने विनंती केली होती. त्यासाठी तिन्ही महिला आरोपींकडे फर्डे याने प्रत्येकी आठ हजार असे २४ हजारांची लाच मागितली. तडजोडीअंती १८ हजार देण्याचे ठरले होते. आरोपी महिलांनी याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ठाणे यांच्याकडे फर्डे याच्याविरोधात तक्रार दाखल केली. त्यावरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक सुनील लोखंडे, अप्पर पोलिस अधीक्षक अनिल घेरडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलिस निरीक्षक पल्लवी ढगे पाटील यांच्या पथकाने सापळा रचून फर्डे याला १८ हजारांची लाच घेताना अटक केली.