नवी मुंबईतील २४ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नवी मुंबईतील २४ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या
नवी मुंबईतील २४ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या

नवी मुंबईतील २४ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या

sakal_logo
By

नवी मुंबई, ता. २ (वार्ताहर) : तीन महिन्यांपूर्वी नवी मुंबई पोलिस आयुक्तपदी आलेले मिलिंद भारंबे यांनी अखेर नवी मुंबई पोलिस आयुक्तालयातील २४ पोलिस निरीक्षकांच्या तडकाफडकी बदल्या केल्या आहेत. प्रशासकीय कामकाजाच्या अनुषंगाने व जनहितार्थ सदर बदल्या केल्याचे पोलिस आयुक्तांनी आपल्या आदेशात म्हटले असले तरी आयुक्तालयातील अवैध धंद्यांना लगाम घालण्यासाठी व अधिकाऱ्यांना शिस्त लावण्यासाठी पोलिस आयुक्तांनी बदल्यांचा बडगा उगारल्याचे बोलले जात आहे.

विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी उरण पोलिस ठाण्याच्या हद्दीत पैसे दुप्पट करून देण्याचे आमिष दाखवून लोकांची फसवणूक करणाऱ्या भामट्याला दहा कोटीच्या रक्कमेसह पकडण्यात आले होते. मात्र सदर प्रकरण योग्यरीत्या न हाताळल्याने पोलिस आयुक्तांनी उरण पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकाची तडकाफडकी पोलिस नियंत्रण कक्षात बदली करून इतर अधिकाऱ्यांना इशारा दिला होता. त्याच सुमारास नवी मुंबई पोलिस आयुक्तालयातील इतर पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या बदलीचे वारेदेखील आयुक्तालयात घोंघावत होते. अखेर गुरुवारी (ता. २) आयुक्तालयातील २४ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या.