अवैध मद्य वाहतूक करणारा टेम्पो उलटला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अवैध मद्य वाहतूक करणारा टेम्पो उलटला
अवैध मद्य वाहतूक करणारा टेम्पो उलटला

अवैध मद्य वाहतूक करणारा टेम्पो उलटला

sakal_logo
By

कासा, ता. ३ (बातमीदार) : उधवा कासा राज्य मार्गावर अवैध मद्य वाहतूक करणारा टेम्पो चरी पावन गावाजवळ पलटी झाल्याची घटना गुरुवारी रात्री घडली. या अपघातात वाहन चालक जखमी झाला. गुरुवारी रात्री दहाच्या वाजण्याच्या सुमारास दमण बनावटीची अवैध विना परवाना मद्य वाहतूक करणारा टेम्पोचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने चरी पावन गावाजवळ हा टेम्पो पलटी झाला. टेम्पो उलटल्याने मद्याचे बॉक्सखाली मद्याच्या बाटल्या मोठ्या प्रमाणावर फुटल्या. यावेळी ग्रामस्थांनी मद्याच्या बाटल्या लंपास करण्यास एकच गर्दी केली. या घटनेची माहिती कळताच कासा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत ग्रामस्थांच्या मदतीने जखमी टेम्पोचालकाला रूग्णालयात दाखल केले. याप्रकरणी वाहन चालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी एक लाख बारा हजार रुपये किमतीची अवैध मद्यासह पाच लाख किमतीचा टेम्पो जप्त केला असून पुढील कारवाई कासा पोलिस करीत आहेत.