Tue, May 30, 2023

वृद्धाची ऑनलाईन १० लाखांची फसवणूक
वृद्धाची ऑनलाईन १० लाखांची फसवणूक
Published on : 3 March 2023, 3:16 am
मुंबई, ता. ३ : परदेशात जाण्यासाठीच्या विमानांची तारीख बदलणे पवईतील एका वृद्धाला महागात पडले आहे. तारीख बदलण्याच्या निमित्ताने त्यांच्या बँक खात्यातून १० लाखांहून अधिक रक्कम लंपास झाली. या प्रकरणी पवई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ७८ वर्षीय तक्रारदार हरवंद सिंग छापरा पत्नीसह पवईत राहतात. त्यांना २२ फेब्रुवारीला एकाने संपर्क साधून मुंबई-अमेरिका विमानाच्या तिकिटाची तारीख बदल्याबाबत विचारणा केली. त्यावर छापरा यांनी होकार देत समोरून त्यांना शुल्क भरण्यास सांगण्यात आले; परंतु समोरील व्यक्तीने छापरा यांचे बँक खाते क्रमांक आणि डेबिट कार्ड क्रमांक घेत १० लाख १५ हजार रुपये काढून घेतले.