एसटी कर्मचाऱ्यांना वेतन मिळणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एसटी कर्मचाऱ्यांना वेतन मिळणार
एसटी कर्मचाऱ्यांना वेतन मिळणार

एसटी कर्मचाऱ्यांना वेतन मिळणार

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. ३ : राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न ऐरणीवर आला असताना, अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एसटी महामंडळाला नियमित दरमहा १०० कोटी देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार परंपरागत २९ सवलतींसाठी मिळणाऱ्या मासिक सवलत मूल्याची प्रतिपूर्ती रक्कम आणि अतिरिक्त १०० कोटी मिळून एसटीला ३२४.७४ कोटी रुपये देण्याचा शासन निर्णय तातडीने काढण्यात आला. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या मार्च महिन्याच्या वेतनाचा प्रश्न मिटला आहे.

महाविकास आघाडी सरकारने दरमहा ३६० कोटी रुपये एसटीला देण्याची घोषणा करून त्याची अंमलबजावणी केली होती. त्यामुळे यापूर्वी वेतनाचा प्रश्न कधी उपस्थित झाला नव्हता; मात्र शिंदे-फडणवीस सरकारमध्ये एसटी कर्मचाऱ्यांना दर महिन्याला वेतनासाठी वाट पहावी लागत होती. अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी एसटी महमंडळाला नियमित मदतीच्या घोषणेची प्रतिपूर्ती करत कर्मचाऱ्यांच्या मार्च महिन्याच्या वेतनाचा मार्ग सुकर केला आहे.