Mon, June 5, 2023

पश्चिम द्रुतगतीवर अपघातात एकाचा मृत्यू
पश्चिम द्रुतगतीवर अपघातात एकाचा मृत्यू
Published on : 3 March 2023, 5:17 am
मुंबई, ता. ३ : पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाकोला परिसरात एका लक्झरी बसने धडक दिल्याने टेम्पो चालकाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी पहाटे घडली. अख्तर चौधरी असे मृत टेम्पो चालकाचे नाव आहे. धडक दिल्यावर आरोपी बस चालकाने पळ काढला. या प्रकरणी वाकोला पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. वाहनात बिघाड झाल्याने अख्तर चौधरींनी टेम्पो महामार्गाच्या बाजूला थांबवला होता; मात्र मागून येणाऱ्या लक्झरी बसने त्याला पाठीमागून धडक दिली. यात त्यांना गंभीर दुखापत झाली आणि नंतर त्याचा मृत्यू झाला.