विद्युतीकरणामुळे ५५६ कोटींची बचत

विद्युतीकरणामुळे ५५६ कोटींची बचत

मुंबई, ता. ३ : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात १०० टक्के विद्युतीकरण झाल्यामुळे मध्य रेल्वेची वार्षिक ५५६ कोटी रुपयांची बचत होत आहे. भारतीय रेल्वेने २०३० पूर्वी शून्य कार्बन उत्सर्जनाचे उद्दिष्ट ठेवले असून त्यादृष्टीने प्रयत्न सुरू असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाचे विभागीय व्यवस्थापक रजनीश कुमार गोयल यांनी दिली.
देशातील विजेवरील पहिली रेल्वे ३ फेब्रुवारी १९२५ रोजी तत्कालीन व्हिक्टोरिया टर्मिनस (आताचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस) ते कुर्लादरम्यान धावली. २००१ मध्ये मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील रेल्वेचा वीजपुरवठा डीसीवरून एसी करण्यास सुरुवात झाली. त्यामुळे २०१६ मध्ये लोकल सेवेला कोणताही अडथळा न येता वीजपुरवठा करण्याचे काम पूर्ण झाले. दरम्यान, ९ डब्यांच्या लोकल १२ डब्यांच्या झाल्यामुळे प्रवासी क्षमता ३३ टक्क्यांनी वाढली.
मुंबई विभागात प्रामुख्याने राजधानी एक्स्प्रेस, वंदे भारत एक्स्प्रेस, डेक्कन क्वीन, पंजाब मेल, तेजस एक्स्प्रेस, विदर्भ एक्स्प्रेस, दुरांतो एक्स्प्रेस विजेवर धावतात. नुकतीच मुंबई-लातूर एक्स्प्रेस विजेवर सुरू केली. यामुळे मध्य रेल्वेच्या इंधनाच्या बिलात मोठी बचत होत असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाचे विभागीय व्यस्थापक रजनीश कुमार गोयल यांनी दिली.
----
चार गाड्यांचे विद्युतीकरण शिल्लक
मध्य रेल्वे मार्गावरील बिदर एक्स्प्रेस, पनवेल-नांदेड, तुतारी आणि देवगिरी या चार मेल-एक्स्प्रेसचे विद्युतीकरण होणे शिल्लक असून येत्या महिन्याभरात ते पूर्ण होण्याची शक्यता असल्याचे गोयल यांनी सांगितले.
---
मध्य रेल्वेची क्षमता
एकूण लोकोमोटिव्ह - २२५
डिझेल इंजिन - १६८
मिनी ट्रेन नॅरोगेज - १२
-------
विद्युतीकरणाचे फायदे
- पर्यावरण-अनुकूल वाहतुकीचे साधन
- आयात केलेल्या डिझेल इंधनावरील अवलंबित्व कमी
- परकीय चलनात बचत
- कार्बन उत्सर्जानत घट
- व्यवस्थापन खर्चात बचत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com