Tue, March 28, 2023

नवाजुद्दीनला सख्ख्या भावानेच दाखवला बाहेरचा रस्ता
नवाजुद्दीनला सख्ख्या भावानेच दाखवला बाहेरचा रस्ता
Published on : 3 March 2023, 5:14 am
मुंबई, ता. ३ : अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी त्याच्या चित्रपट आणि वेब सिरीजमधील कामांमुळे प्रसिद्ध आहे. काही दिवसांपासून त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे तो चर्चेत आहे. नवाजुद्दीनची पत्नी आलिया आणि शमस यांच्याशी झालेल्या वादामुळे नवाजुद्दीनच्या आईची तब्येत सतत खालावत चालली आहे. म्हणून नवाजुद्दीन आईला भेटायला गेला, पण त्याच्या सख्खा भावानेच त्याला घरामध्ये घेतले नसल्याचे समोर आले आहे. भावाने नवाजुद्दीनला बंगल्याच्या गेटवरूनच परत पाठवले आहे. हा व्हिडीओ सध्या समाजमाध्यमावर व्हायरल झाला आहे. यामध्ये ‘आईची प्रकृती बरी नाही. तिला कोणालाही भेटायची इच्छा नाही. त्यामुळे तू तिला भेटू शकत नाहीस’, असे भाऊ त्याला म्हणत आहेत.