
बोर्डीत खगोल विज्ञान प्रदर्शन उत्साहात
बोर्डी, ता. ४ (बातमीदार) : बोर्डी येथील एस. आर. सावे शिबिर निवास येथे ‘खगोल विज्ञान प्रदर्शन’ भरवण्यात आले होते. अध्यायन संस्था मुंबई, मराठी विज्ञान परिषद बोर्डी शाखा आणि माजी विद्यार्थी संघातर्फे हे शिबिर भरवण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन आचार्य भिसे शिक्षण संस्थेचे अध्यक्ष एन. के. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. या प्रसंगी अ. पा. देशपांडे, जेष्ठराज जोशी, दिलीप हेर्लेकर, घोलवडचे सरपंच रवींद्र बुजड, अध्ययन संस्थेचे अध्यक्ष भूपेंद्र मुजुमदार आदी मान्यवर उपस्थित होते. ऊर्मिला करमरकर यांनी मराठी विज्ञान परिषदेच्या कार्याचा आढावा घेतला. जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक शैलेश राऊत यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्ययन संस्थेचे संचालक राजीव वर्तक यांनी, सूत्रसंचालन पौर्णिमा राऊत व रुजुता बारी यांनी; तर राजेंद्र चुरी यांनी आभार मानले.