प्राच्यविद्या संस्थेतर्फे विलास बळेल यांच्या ठिपका चित्रांचे प्रदर्शन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्राच्यविद्या संस्थेतर्फे विलास बळेल यांच्या ठिपका चित्रांचे प्रदर्शन
प्राच्यविद्या संस्थेतर्फे विलास बळेल यांच्या ठिपका चित्रांचे प्रदर्शन

प्राच्यविद्या संस्थेतर्फे विलास बळेल यांच्या ठिपका चित्रांचे प्रदर्शन

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ४ : ठिपक्यांनी आरेखलेली सीमाभागातील मूर्तिशिल्पांच्‍या चित्रांची पर्वणी ठाणेकरांना पाहता यावी. यासाठी प्राच्यविद्या अभ्यास संस्था, ठाणेतर्फे ज्येष्ठ चित्रकार विलास बळेल यांच्या ठिपका चित्रांच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन रविवार ५ ते १२ मार्चपर्यंत सकाळी ११ ते सायंकाळी ६ या वेळेत होणार आहे.
ठाण्याच्या सांस्कृतिक क्षेत्रात प्राच्यविद्या अभ्यास संस्था मोलाची भूमिका बजावत आहे. ४० वर्षांपासून हिंदुस्थानी कला, संस्कृती आणि संस्कृत भाषेचे संशोधन, प्रचार आणि प्रसाराचे काम करणारी ही ठाण्यातील अतिशय महत्त्वाची संस्था आहे. या संस्थेमार्फत प्राच्यविद्येसंबंधी विविध चर्चासत्रे, परिषदा, अभ्यासदौरे, ग्रंथप्रदर्शने आणि व्याख्यानाचे नियमितपणे आयोजन केले जाते. या उपक्रमाचा भाग म्हणून जेष्ठ चित्रकार विलास बळेल यांच्या ठिपका चित्रांच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन रविवा ५ मार्च रोजी सकाळी ११ वाजता महाराष्ट्र सरकारच्या पुरातत्त्व विभागाचे माजी संचालक तथा जेष्ठ पुरातत्त्व शास्त्रज्ञ डॉ. अरविंद जामखेडकर यांच्या हस्ते होणार आहे. या प्रदर्शनादरम्यान शिल्पकला, चित्रकला आणि कलेविषयी कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. पहिल्या दिवशी, ५ मार्चला प्रदर्शनाचे उदघाटन झाल्यांनतर महाराष्ट्र सरकारच्या पुरातत्त्व विभागाचे माजी संचालक तथा जेष्ठ पुरातत्त्व शास्त्रज्ञ डॉ. अरविंद जामखेडकर ‘भारतीय मंदिरांची शिल्पकला’ विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. तर शनिवार, ११ मार्च रोजी सकाळी ११ वाजता चित्रकार विलास बळेल हे चित्रकलेच्या सादरीकरणाविषयी उपस्थितांशी संवाद साधणार आहेत. त्याच बरोबर चित्रकार सदाशिव कुलकर्णी चित्रकलेविषयी माहिती सांगणार आहेत. प्रर्शनाच्या शेवटच्या दिवशी रविवार, १२ मार्च रोजी सकाळी ११ वाजता ज्येष्ठ शिल्पकार सिद्धार्थ साठे आणि ज्येष्ठ चित्रकार विजयराज बोधनकर यांच्या कलांच्या प्रत्यक्ष सादरीकरणाची अनुभूती प्रेक्षकांना घेता येणार असल्याची माहिती प्राच्यविद्या अभ्यास संस्थेचे अध्यक्ष डॉ. विजय बेडेकर यांनी दिली.


--