न्यू आयडीयलच्या विद्यार्थ्यांचे धवल यश

न्यू आयडीयलच्या विद्यार्थ्यांचे धवल यश

वासिंद, ता. ५ (बातमीदार) : राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त जीएमआरटी या टाटा फंडामेंटल रिसर्च इन्स्टिट्यूट, अंतर्गत खोदाद, पुणे येथे आयोजित केलेल्या राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनात वासिंदच्या न्यू आयडीयल स्कूलच्या पार्थ सुनील काठोळे व प्रज्वल प्रशांत जाधव या नववीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कोनमापक दुर्बीण या प्रकल्पाला माध्यमिक विभागात प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. विद्यालयाचे प्राचार्य अरुण भोईर व विज्ञान शिक्षक राजेश जामसंडेकर यांच्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या या दुर्बिणीद्वारे त्रिकोणमितीय अध्ययन सुलभ होऊन दूरच्या घटकांचे अचूक उंची मापन करता येते. या प्रदर्शनात देशभरातून विविध विभागांत ऑनलाईन व ऑफलाईन सुमारे ७०० प्रकल्प मांडण्यात आले होते. त्यात प्रज्वल जाधव, पार्थ काठोळे, विज्ञान शिक्षक राजेश जामसंडेकर यांना माध्यमिक विभागात प्रथम क्रमांकाचे स्मृतिचिन्ह, प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पुणे अधरकर रिसर्च इन्स्टिट्यूटचे मुख्याध्यापक, डॉ. प्रशांत धाकेफाळकर, एनसीआरटी, जीएमआरटीचे अॅडमिनीस्ट्रेटर डॉ. जे. के. सोलंकी, एनसीआरए, टीआयएफआरचे प्रा. डी. व्ही. लाल, एनसीआरएचे डायरेक्टर प्रा. यशवंत गुप्ता, जीएमआरटीचे अॅडमिनीस्ट्रेटर ए. बी. जोंधळे आदी मान्यवर उपस्थित होते. न्यू आयडीयल स्कूलच्या याच प्रकल्पाची राज्यस्तरावरील विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झाली आहे. विद्यालयाचे प्राचार्य अरुण भोईर, उपप्राचार्य नीलम जाधव व सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. या यशाबद्दल विद्यालयाचे परिसरातून कौतुक होत आहे.
------------------------------------
वासिंद : यशस्वी विद्यार्थ्यांना सन्मानित करताना मान्यवर.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com