ठाण्याच्या स्टारफिशच्या जलतरणपटूंवर बक्षीसांचा वर्षाव

ठाण्याच्या स्टारफिशच्या जलतरणपटूंवर बक्षीसांचा वर्षाव

दिवा, ता. ५ (बातमीदार) : डोंबिवली जिमखाना येथे झालेल्या २४ व्या ॲक्वाटिक जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेत ठाण्यातील स्टारफिश फाऊंडेशनच्या जलतरणपटूंनी विशेष कामगिरी करीत बक्षिसांची लयलूट केली. या स्पर्धेत आठ वर्षांखालील वयोगटात ओजस मोरे याने एक सुवर्ण, एक रौप्य व दोन कांस्य, नक्ष निसार याने एक रौप्य, एक कांस्य, नायरा कौशल हिने पाच कांस्य, माही जांभळे हिने चार सुवर्ण, एक रौप्य आणि वैयक्तिक चॅम्पियनशिप पटकाविली.

दहा वर्षांखालील वयोगटात निधी सामंत हिने सहा सुवर्णपदकांसह वैयक्तिक चॅम्पियनशिप प्राप्त केली. फ्रेया शाह हिने एक सुवर्ण, तीन रौप्य, एक कांस्य, श्रुती जांभळे हिने एक सुवर्ण, किमया गायकवाड एक सुवर्ण, रुद्र निसार एक कांस्य, मोहित देशपांडे एक कांस्य, १२ वर्षांखालील वयोगटात आयुषी आखाडे चार रौप्य, परीन पाटील एक रौप्य, सोहम पाटील एक रौप्य, शर्वण पेठे एक रौप्य, सोहम साळुंखे एक रौप्य, दोन कांस्य, स्नेहा लोकरे एक कांस्यपदक पटकाविले.

५० वर्षांखालील गटात कविता शहा यांनी एक सुवर्ण, एक रौप्य; तर ५० वर्षांवरील गटात प्रशांत साळुंखे यांनी दोन सुवर्णपदके प्राप्त केली. हे सर्व जलतरणपटू ठाणे महापालिकेच्या कै. मारोतराव शिंदे तरणतलाव येथे प्रशिक्षक नीलकंठ आखाडे, कैलास आखाडे, अतुल पुरंदरे, रुपेश घाग यांच्या मार्गदर्शनाखाली जलतरणाचे धडे घेत आहेत. या सर्व जलतरणपटूंचे ठाणेकरांकडून कौतुक होत आहे. महाराष्ट्र हौशी जलतरण संघटनेचे उपाध्यक्ष राजेश मोरे यांनी या सर्वांचे कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com