
उल्हासनगरात उद्धव सेनेचे महाआरोग्य शिबिर
उल्हासनगर, ता. ५ (वार्ताहर) : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने उल्हासनगरात आयोजित केलेले महाआरोग्य शिबिर हाऊसफुल्ल ठरले असून या शिबिराचा शेकडोंच्या संख्येने नागरिकांनी लाभ घेतला आहे. शिवगर्जना अभियान कॅम्प नंबर तीन ओटी सेक्शनमधील संतोषनगर शिवसेना शाखेत उपविभागप्रमुख आदिनाथ पालवे, अशोक जाधव, शाखाप्रमुख बाळू जाधव यांच्या पुढाकाराने महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शासकीय रुग्णालय आणि क्रिटी केअर रुग्णालयाच्या डॉक्टरांनी उच्च रक्तदाब, मधुमेह, मलेरिया, टायफॉईड, ताप, सर्दी, खोकला, अतिसार आदींवर तपासणी करून मोफत औषधोपचार करण्यात आले. या वेळी जिल्हाप्रमुख चंद्रकांत बोडारे, जिल्हा समन्वयक धनंजय बोडारे, उपजिल्हाप्रमुख राजेंद्र शाहू, शहरप्रमुख पिंकी भुल्लर, उपशहरप्रमुख भगवान मोहिते, राजन वेलकर, दिलीप मिश्रा, शहर संघटक डॉ. जानू मानकर, महिला आघाडी संघटक जया तेजी, विभाग प्रमुख दीपक साळवे, दशरथ चौधरी आदीसह शिवसैनिक उपस्थित होते.