उल्हासनगरात पर्यावरण पूरक होळीची हाक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उल्हासनगरात पर्यावरण पूरक होळीची हाक
उल्हासनगरात पर्यावरण पूरक होळीची हाक

उल्हासनगरात पर्यावरण पूरक होळीची हाक

sakal_logo
By

उल्हासनगर, ता. ५ (वार्ताहर) : पालिका आयुक्त अजीज शेख यांनी होळीची पूजा करून आणि जलप्रतिज्ञेद्वारे संदेश देऊन उल्हासनगरातील नागरिकांना पर्यावरणपूरक होळी साजरी करण्याची हाक दिली आहे. महापालिकेच्या पर्यावरण विभागाच्या वतीने राष्ट्रीय शुद्ध हवा कार्यक्रम आणि माझी वसुंधरा अभियानांतर्गत पर्यावरणपूरक होळी सण साजरा करण्याचा उपक्रम पालिकेच्या प्रवेशद्वारासमोर राबवण्यात आला. आगामी होळी दहन उत्सव लक्षात घेऊन झाडे तोडू नये, प्लास्टिक फुगे, रासायनिक रंग वापरू नये, पाणी वाचवा असे संदेश यावेळी आयुक्त अजीज शेख यांनी जलप्रतिज्ञेद्वारे देऊन पर्यावरणपूरक होळीची हाक दिली. यावेळी अतिरिक्त आयुक्त डॉ.करुणा जुईकर, पर्यावरण विभाग प्रमुख विशाखा सावंत, प्रशासनाधिकारी अशोक मोरे, मुख्य स्वच्छता निरीक्षक विनोद केणे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अनिता सपकाळे उपस्थित होते.