बच्चे कंपनीची भीम, पांडाच्या पिचकाऱ्यांना पसंती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बच्चे कंपनीची भीम, पांडाच्या पिचकाऱ्यांना पसंती
बच्चे कंपनीची भीम, पांडाच्या पिचकाऱ्यांना पसंती

बच्चे कंपनीची भीम, पांडाच्या पिचकाऱ्यांना पसंती

sakal_logo
By

प्रमोद जाधव, अलिबाग
होळीनंतर दुसऱ्या दिवशी धुळीवड साजरी केली जाते. लहानमुलांना या सणाचे विशेष आकर्षण असते. रंगांची उधळण करणाऱ्या या सणासाठी बाजारात वेगवेगळ्या आकार आणि प्रकारच्या पिचकाऱ्या आल्‍या आहेत. यात भारतीय बनावटीच्या वॉटर टँकमध्ये भीम, युनिकॉन व पांडाचे कार्टून असलेल्या पिचकाऱ्यांना बच्चे कंपनीकडून पसंती मिळत आहे.
होळीच्या दिवशी विधीवत पूजा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी धुळवड खेळली जाते. बुरा ना मानो होली है, म्‍हणत एकमेकांच्या अंगावर रंगांची उधळण करीत जल्‍लोष केला जातो. साध्या पिचकाऱ्या अवघ्‍या २० रुपयांपासून १५० रुपयांपर्यंत आहेत. तर कार्टूनच्या पिचकाऱ्या दोनशे रुपयांपासून चारशे रुपयांपर्यंत आहेत. तसेच वेगवेगळ्या रंगाचे मॅजिक फुगेदेखील पाच रुपयांपासून २० रुपयांपर्यंत बाजारात उपलब्‍ध आहेत. यंदा छोटा भीम, युनिकॉन, पांडा कार्टून असलेल्या वॉटरटँकच्या पिचकाऱ्यांना ग्राहकांकडून पसंती दर्शविली आहे. भारतीय बनावटीच्या या पिचकाऱ्यांना मागणी अधिक असल्याचे विक्रेते संदेश तुणतुणे यांनी सांगितले.

चिनी बनावटीच्या पिचकाऱ्यांकडे पाठ
जिल्ह्यातील बाजारात वेगवेगळ्या पिचकाऱ्यांची दुकाने थाटली आहेत. त्यामध्ये भारतीय बनावटीसह चिनीबनावटीच्या पिचकाऱ्यांचा समावेश आहे. परंतु ग्राहकांकडून भारतीय बनावटीच्या पिचकाऱ्यांना पसंती देण्यात येत असल्‍याचे विक्रेत्‍यांकडून सांगण्यात येत आहे.