Sun, May 28, 2023

परुळेकर महाविद्यालयात वित्तीय साक्षरता अभियान उपक्रम
परुळेकर महाविद्यालयात वित्तीय साक्षरता अभियान उपक्रम
Published on : 5 March 2023, 9:31 am
कासा, ता. ५ (बातमीदार) : तलासरी येथील गोदावरी शामराव परुळेकर कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात वित्तीय साक्षरता अभियान हा उपक्रम राबवण्यात आला. परुळेकर महाविद्यालय, सिक्युरिटी एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया, बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज गुंतवणूक सुरक्षा फंड मुंबई आणि डब्ल्यू एक्स कन्सल्टन्स प्रायव्हेट लिमिटेड, नाशिक या संस्थांच्या साह्याने ऑनलाईन झूम मीटिंगच्या माध्यमातून आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमांमध्ये प्रा. गौरी गीत आणि दीक्षा शेट्टी यांनी सहभाग नोंदवला. भारतातील भांडवल बाजार आणि भांडवल बाजारातील विविध गुंतवणूक संधी यावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.