होळीच्या सणाला महागाईचा रंग

होळीच्या सणाला महागाईचा रंग

नवीन पनवेल, ता. ४ (वार्ताहर)ः पनवेल शहरातील वसाहतींसह ग्रामीण भागातील बाजारपेठा होळीसाठी सज्ज झाल्या आहेत. कोरोना काळानंतर निर्बंधमुक्त होळी साजरी करण्यासाठी पनवेलकर सज्ज झाले आहेत; तर दुकानदारांनीदेखील विविध प्रकारचे रंग, पिचकाऱ्या आणल्या आहेत. मात्र, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा रंग, पिचकारी, गुलालासह होळीच्या दिवशी लागणाऱ्या गाठीच्या दरात वाढ झाली असल्याने खरेदी करणाऱ्यांमध्ये निरुत्साह आहे.
पनवेल शहरातील मुख्य बाजारातील पिचकारी, रंग, गुलाल घाऊक विक्रेत्यांची दुकाने सजली आहेत. पनवेलमध्ये मुंबई, दिल्लीतून येथून साहित्य व्यापाऱ्यांनी आणले आहे. यंदाच्या उत्सवात चांगला व्यवसाय होईल, या आशेने छोट्या व्यावसायिकांनी होळीचे सर्व सामान दुकानात भरले आहे, पण दहावी व बारावीच्या परीक्षा सुरू असल्याने बाजारात खरेदीदारांमध्ये उत्साह दिसून येत नाही. होळी व धूलिवंदनाला बच्चे कंपनीसाठी पिचकारीचे विविध प्रकार उपलब्ध आहेत. लहानांपासून मोठ्यांना भुरळ घालतील अशा विविध प्रकारच्या पिचकाऱ्या २५ ते ५५० रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत.
--------------------------
साखरेची गाठी १०० रुपयांवर
होळीचा सण म्हटले की गाठीला (साखरेच्या माळा) महत्त्व आहे. होळी पेटवण्यासाठी गाठी प्रसाद म्हणून उपयोगात येते. मात्र, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा गाठीचे दर ३० टक्क्यांनी वाढले आहेत. पनवेल शहरात गाठी यंदा १०० रुपयांवर गेली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com