सणाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे सुरक्षा समितीची बैठक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सणाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे सुरक्षा समितीची बैठक
सणाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे सुरक्षा समितीची बैठक

सणाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे सुरक्षा समितीची बैठक

sakal_logo
By

वडाळा, ता. ४ (बातमीदार) ः होळी, धूलिवंदन सणाच्या पार्श्वभूमीवर वडाळा रेल्वे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक डी. एम. खुपेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी (ता. ३) सॅण्डहर्स्ट रोड रेल्वे स्थानकातील स्टेशन प्रबंधक कार्यालयात रेल्वे सुरक्षा समिती सदस्यांची बैठक घेण्यात आली. यात रेल्वे स्थानक परिसरात नियमित आपले कर्तव्य बजावताना डोळे आणि कान उघडे ठेवून वावरावे तसेच बेवारस बॅग, संशयास्पद वस्तू, इलेक्ट्रॉनिक वस्तू अथवा संशयास्पद व्यक्ती व त्याच्या संशयास्पद हालचाली दिसून आल्यास तात्काळ रेल्वे पोलिस, आरपीएफ आणि स्टेशन मास्तर यांना कळविणे किंवा रेल्वे पोलिस हेल्पलाईन नंबर १५१२ वर संपर्क करणे, याबाबत आवाहन करण्यात आले आहे. या वेळी सॅण्डहर्स्ट रोड स्टेशन प्रबंधक विनायक शेवाळे, वडाळा लोहमार्ग पोलिस उप-निरीक्षक मंगेश विचारे व गोपनीय शाखेचे अंमलदार, पॉईंट्समन, सफाई कर्मचारी, बूटपॉलिश कामगार, कॅन्टीन मॅनेजर, कॅन्टीनवेंडर असे एकूण १२ सुरक्षा समिती सदस्य उपस्थित होते.