Wed, May 31, 2023

डोंबिवलीत ६३ टन घनकचरा संकलन
डोंबिवलीत ६३ टन घनकचरा संकलन
Published on : 4 March 2023, 9:39 am
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ४ : महाराष्ट्र भूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दीपूर्तीनिमित्त डोंबिवली, दिवा व मुंब्रा परिसरात श्री सदस्यांच्या वतीने महास्वच्छता अभियान राबवण्यात आले. या अभियानांतर्गत सदस्यांनी डोंबिवली ते मुंब्रा परिसरातील रस्त्यांची सफाई केली. यामध्ये ६६.८० टन कचरा गोळा करत त्याची विल्हेवाट लावण्यात आली. स्वच्छता अभियानात पाच हजार १९८ सदस्य सहभागी झाले होते. या अभियानासाठी महापालिकेच्या वाहनांव्यतिरिक्त सात तीनचाकी टेम्पो, सहा चारचाकी टेम्पो, सहा डम्पर व चार जेसीबी वाहनांचा वापर करण्यात आला.