होळी-रंगपंचमीसाठी पोलिस यंत्रणा सज्ज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

होळी-रंगपंचमीसाठी पोलिस यंत्रणा सज्ज
होळी-रंगपंचमीसाठी पोलिस यंत्रणा सज्ज

होळी-रंगपंचमीसाठी पोलिस यंत्रणा सज्ज

sakal_logo
By

ठाणे, ता. ४ (वार्ताहर) : जल्लोषात साजऱ्या होणाऱ्या होळी आणि रंगपंचमी सणासाठी ठाणे पोलिसांकडून चोख बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे. ठाणे पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतील पाच परिमंडळातील या बंदोबस्तात ४ हजार ३३ पोलिस अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासह शहर पोलिसांसोबतच वाहतूक पोलिसही खडा पहारा देणार आहेत.

६ मार्च रोजी होळी आणि ७ मार्च रोजी धूलिवंदन मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात येतो. ठाणे पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत ठाणे, भिवंडी, कल्याण, उल्हासनगर आणि वागळे अशी पाच परिमंडळे आहेत. यामधून यंदा ५६१ सार्वजनिक; तर दोन हजार १२१ खाजगी होळ्या पेटवण्यात येणार असल्याची माहिती ठाणे पोलिसांनी दिली. होळी आणि रंगपंचमी (धूलिवंदन) साजरा करण्यासाठी मोठा जनसमुदाय सार्वजनिक ठिकाणी जमतो. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ठाणे पोलिस महत्वाच्या गर्दीच्या ठिकाणी आणि रहदारीच्या रस्त्यावर नाकाबंदी करणार आहेत. उत्सवात महिलांची छेडछाड, अंगावर रंग टाकणे, विनयभंग, फुगे मारणे, नाचताना अंगविक्षेप करणे सारखे गुन्हे घडण्याची शक्यता असल्याने ठाणे पोलिस खडा पहारा देणार आहेत.

--------------
गर्दीच्या ठिकाणी सीसीटीव्ही आणि गस्त
उत्सवाला गालबोट लागू नये, मोठ्या जमावाला नियंत्रित करणे सुलभ जावे, अपप्रवृत्तीची नाकाबंदी करण्यासाठी पाचही परिमंडळात महत्त्वाच्या गर्दीच्या ठिकाणी सीसीटीव्ही केमेरे बसवण्यात येणार आहेत. परिमंडळातील उच्चभ्रू गृहसंकुले, हॉटेल्स, ढाबे, लॉन्स परिसरात साध्या गणवेशातील पोलिसांची गस्त राहणार आहे. महिलांची छेडछाड आणि विनयभंगासारख्या प्रकारांना आळा घालण्यासाठी निर्भय पथके गस्त घालणार आहेत. विशेष शाखेद्वारे या पथकाची निर्मिती कार्यान्वित करण्यात आलेली आहे.

-------------------
खाडीकिनारा रडारवर
होळी, धूलिवंदन आदींच्या उत्साहात जमलेल्या गर्दीच्या ठिकाणी संशयित हालचाली किंवा संशयित वस्तू आढळल्यास तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन ठाणे पोलिसांनी केले आहे. मद्यपान करून हुल्लडबाजी करणाऱ्यावर तसेच खाडी किनारच्यी जेट्टी आणि लँडिंग पॉईंटदेखील पोलिसांच्या रडारवर राहणार आहे. यासाठी विशेष भरारी पथकांची निर्मिती करण्यात आलेली आहे.

=============
पाच अपरिमंडळातील पोलिस बंदोबस्त

सार्वजनिक होळी ५६१
खासगी होळी २,१२१
एकूण २,६८२


=========
पोलिस बंदोबस्त
अप्पर पोलिस आयुक्त ०३
पोलिस उपायुक्त ०७
सहाय्यक पोलिस आयुक्त ११
पोलिस अधिकारी ४००
पोलिस कर्मचारी (महिलांसह) ३,०००
एकूण ३,४२१


==================
वाहतूक पोलिस बंदोबस्त
पोलिस अधिकारी ४२
पोलिस अंमलदार कर्मचारी ५००
साध्या गणवेशातील पोलिस ७०
एकूण ६१२