फेरीवाल्यांसाठी प्रशिक्षण शिबिर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फेरीवाल्यांसाठी प्रशिक्षण शिबिर
फेरीवाल्यांसाठी प्रशिक्षण शिबिर

फेरीवाल्यांसाठी प्रशिक्षण शिबिर

sakal_logo
By

मुलुंड, ता. ४ (बातमीदार) ः मुंबई-समता हॉकर्स युनियन संलग्न नॅशनल असोसिएशन ऑफ स्ट्रीट व्हेंडर्स ऑफ इंडियाच्या वतीने मुलुंड पश्चिम येथील श्रावस्ती बुद्ध विहार येथे प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरामध्ये फेरीवाल्यांना पंतप्रधान स्वनिधी ते समृद्धी या योजनेची माहिती देण्यात आली आणि रस्त्याचे हक्क काय आहेत, विक्रेते, पोलिस आणि महापालिका अधिकाऱ्यांसमोर त्यांची बाजू कशी मांडू शकतात, रस्त्यावर विक्रेते कायदा २०१४ काय आहे आदी बाबींवर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच संयोजक गुरुनानक सावंत यांनी उपजीविका आणि डिजिटल पेमेंटबद्दल माहिती दिली. तसेच समता हॉकर्स युनियनचे अध्‍यक्ष शरीफ खान यांनी स्ट्रीट व्हेंडर कायदा आणि फेरीवाले आणि ज्यांना अद्याप बँक कर्ज मिळालेले नाही, त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी उपयुक्त अशी माहिती दिली. या प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी (उत्तर भारतीय सेल) सरचिटणीस डॉ. सचिन सिंग, ईशान्य मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष उत्तम गीते, शिवसेना ठाकरे गटाचे युवा नेते राजोल पाटील, राष्ट्रवादीचे तालुका मुलुंड अध्यक्ष ॲड. अमित पाटील उपस्थित होते.