शेणसरी-पलीपाडा रस्त्याची दुर्दशा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शेणसरी-पलीपाडा रस्त्याची दुर्दशा
शेणसरी-पलीपाडा रस्त्याची दुर्दशा

शेणसरी-पलीपाडा रस्त्याची दुर्दशा

sakal_logo
By

कासा, ता. ४ (बातमीदार) : डहाणू तालुक्यातील शेणसरी-गांगोडी ग्रुप ग्रामपंचायतीमधील शेणसरी-पलीपाडा या दीड ते दोन किलोमीटरच्या रस्त्याच्या खडी उखडून चाळण झाली आहे. त्यामुळे या रस्त्यावरून वाहनधारकांसह नागरिकांना चालत जाणेसुद्धा कठीण होत आहे. या साठी हा रस्ता दुरूस्ती करावा, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.
शेणसरी-पलीपाडा या रस्त्याची दुर्दशा गेल्या २० वर्षांपासून झाली आहे. अनेक वेळा दुरूस्तीची मागणी करुनसुद्धा हा रस्ता दुरुस्त केला जात नाही. शेणसरी-गांगोडी ग्रामपंचायतीची तीन हजारच्या आसपास लोकसंख्या असून शेणसरी-पलीपाडा व इतर पाड्यात जाण्यासाठी सूर्या नदीची उपनदी ओलांडून जावे लागते. पावसाळ्यात पूर आल्यास अनेक लोकांचा संपर्क तुटतो. यामुळे रुग्ण, शाळकरी मुले, शेतकरी यांना त्रास सहन करावा लागतो. शासनाच्या गाव तेथे रस्ता या योजनेंतर्गत अनेक भागात रस्ते होत आहेत; पण येथील ग्रामस्थ अजूनही रस्ता खराब असल्याने अनेक सोईंपासून वंचित राहत आहेत. ग्रामपंचायतीतर्फे अनेक वेळा या रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी केली आहे. मात्र अजूनही रस्ता दुरुस्त करण्यात आलेला नाही.

----------------------
गेल्या अनेक वर्षांपासून मी येथील रस्त्याच्या दुरूस्तीसाठी जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्ये प्रयत्न करीत आहे. रस्त्यासाठी पेसाअंतर्गत प्रयत्न केले. ग्रामसडक योजनेअंतर्गत या रस्त्याला मंजूरी मिळाली आहे. त्या मुळे लवकरच हा रस्ता दुरुस्त केला जाईल.
- शैलेश करमोडा, जिल्हा परिषद सदस्य, पालघर

------------------
शेणसरी-पलीपाडा हा रस्ता पूर्णपणे खराब झाला असल्याने अनेक दुचाकी, पादचाऱ्यांचे अपघात होतात. आम्ही ग्रामपंचायतीतर्फे ठराव करुन येथे रस्ता दुरुस्त करावा, तसेच नदीपुढील पाड्यांना जोडणारा पूल करावा, अशी मागणी केली आहे.
- साधना बोरसा, सरपंच, शेणसरी-गांगोडी ग्रामपंचायत

-----------------
गेल्या अनेक वर्षांपासून शेणसरी-पलीपाडा या रस्त्याची दुर्दशा झाली आहे. येथून प्रवास करणे कठीण होत आहे. पावसाळ्यामध्ये वाहनधारक व नागरिकांचे खूप हाल होतात. त्यामुळे लवकरात लवकर हा रस्ता दुरस्त करावा.
- संजू सावर, ग्रामस्थ