खोट्या गुन्ह्यांऐवजी जनरल डायरप्रमाणे गोळ्या घाला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खोट्या गुन्ह्यांऐवजी जनरल डायरप्रमाणे गोळ्या घाला
खोट्या गुन्ह्यांऐवजी जनरल डायरप्रमाणे गोळ्या घाला

खोट्या गुन्ह्यांऐवजी जनरल डायरप्रमाणे गोळ्या घाला

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ४ : प्रभारी सहायक आयुक्तांना मारहाण करणाऱ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसह आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर दाखल केलेल्या गुन्ह्यातील भादंवि ३०७ हे गंभीर कलम संशयास्पद आहे, असे निरीक्षण ठाणे सत्र न्यायालयाने नोंदवले आहे. ठाणे पोलिसांकडून वारंवार खोटे गुन्हे दाखल करण्यात येत असल्याने पोलिस आयुक्तालय आम्हाला जनरल डायर असल्यासारखेच वाटत आहे. त्यामुळे त्यांनी आम्हाला पोलिस मैदानात बोलवावे अन् थेट गोळ्या घालाव्यात. आम्ही निधड्या छातीने त्या झेलू, असे आव्हान देत आता पोलिसांविरोधात जनद्रोह होईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी दिला.

डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या जामिनाचा निर्णय देताना न्यायालयाने उच्च आणि सर्वोच्च न्यायालयातील विविध पाच खटल्यांचा आधार घेतला. तसेच निरीक्षण नोंदवताना, केवळ तक्रारदार सांगतो म्हणून हल्ला करणाऱ्यांच्या हातात हत्यारे होती, असे होत नाही. आव्हाड यांनी महेश आहेर यांच्याविरोधात वर्तकनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानेच तक्रारदाराने आव्हाड यांचे नाव जाणीवपूर्वक घेतले. प्रसारमाध्यमांमध्ये प्रसारित झालेल्या एकाही चित्रणामध्ये कोणतेही शस्त्र दिसत नाही. ही मारहाण हात आणि बुक्क्यांनी झाल्याचे दिसत आहे. कोणतेही शस्त्र वापरलेले नसल्याने ठार मारण्याचा उद्देश स्पष्ट होत नसल्याने दाखल केलेले भादंवि ३०७ हे कलम संशयास्पद आहे, असे परांजपे यांनी स्पष्ट केले.

पोलिस आयुक्तांवर टीका
उद्धव ठाकरे यांची शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते असतील, त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. त्यामुळे आता लवकरच ठाणे पोलिसांच्या विरोधात ठाणेकर ‘जनद्रोह’ करतील. आपणाला कधी-कधी पोलिस आयुक्त जयजित सिंह हे जनरल डायर असल्यासारखे वाटते, असेही परांजपे म्हणाले.