भंगार विक्रीतून ५०० कोटींचा महसूल

भंगार विक्रीतून ५०० कोटींचा महसूल

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. ४ : पश्चिम रेल्वेच्या ‘शून्य भंगार मोहिमें’तर्गत २०२२-२३ आर्थिक वर्षात भंगार विक्रीतून ५०० कोटींहून अधिक महसूल गोळा केला आहे. विशेष म्हणजे भारतीय रेल्वेने पश्चिम रेल्वेला दिलेल्या उद्दिष्टापेक्षा ६२ टक्के जास्त उत्पन्न मिळाले आहे. पश्चिम रेल्वेने आतापर्यंत भंगार विक्रीतून एकूण ५०२.०५ कोटी रुपयांचा महसूल मिळवला आहे. प्रमाणबद्ध उद्दिष्ट ओलांडलेल्या टक्केवारीच्या बाबतीत हे यश सर्व विभागीय रेल्वेमध्ये सर्वोच्च आहे. याशिवाय महसुलाच्या बाबतीत भारतीय रेल्वेत पश्चिम रेल्वे सर्व रेल्वेंमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. भंगाराच्या विल्हेवाटीने केवळ महसूलच मिळत नाही, तर परिसर स्वच्छ आणि पर्यावरणपूरक ठेवण्यास मदत होत असल्याचे पश्चिम रेल्वेने मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com