जाहिरात फलकामुळे अपघाताला आमंत्रण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जाहिरात फलकामुळे अपघाताला आमंत्रण
जाहिरात फलकामुळे अपघाताला आमंत्रण

जाहिरात फलकामुळे अपघाताला आमंत्रण

sakal_logo
By

विरार, ता. ४ (बातमीदार) : वसई-विरार महापालिका क्षेत्रात असलेल्या जाहिरात फलक व कमानींमुळे अपघाताची शक्यता असल्याने या फलक व कमानींचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात यावे, अशी मागणी माजी स्थायी समिती सभापती तथा शिवसेना तालुका प्रमुख सुदेश चौधरी यांनी केली आहे. वसई-विरार शहर महापालिका हद्दीत अनेक ठिकाणी जाहिरात फलक, होर्डिंग तसेच वेगवेगळ्या नागरी वस्त्यांत कमानी उभारण्यात आलेल्या आहेत. हे जाहिरात फलक, होर्डिंग तसेच उभारलेल्या कमानी या बऱ्याच वर्षांपासूनच्या आहेत. यातील बहुतांश कमानी या नगर परिषद काळापासूनच्या आहेत. त्यामुळे त्या जीर्ण झालेल्या आहेत. मागील काही वर्षांत फलक व कमानी कोसळल्याने अनेक दुर्घटना घडलेल्या आहेत. त्यात जीवित व वित्तहानी झालेली आहे. त्यामुळे शहरात अस्तित्वात असलेल्या फलक, होर्डिंग्ज व कमानींचे आरसीसी कन्सल्टंटच्या माध्यमातून तात्काळ स्ट्रक्चरल ऑडिट करून घ्यावे, अशी मागणी माजी स्थायी समिती सभापती सुदेश चौधरी यांनी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्याकडे केली आहे.