डॉक्टरच्या खात्यातून लाखाची रक्कम परस्पर हडपली

डॉक्टरच्या खात्यातून लाखाची रक्कम परस्पर हडपली

नवी मुंबई (वार्ताहर) : महिला डॉक्टरने कुणालाही ओटीपी दिला नसतानादेखील त्यांच्या बँक खात्यातून एक लाख १० हजारांची रक्कम परस्पर काढण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. खारघर पोलिसांनी या प्रकरणात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. महिला डॉक्टर खारघरमध्ये राहण्यास असून त्यांचा त्याच भागात दवाखाना आहे. २७ फेब्रुवारीच्या रात्री पावणेदहा वाजण्याच्या सुमारास क्लिनिक बंद करून घरी जात असताना त्यांच्या खात्यातून ९९,९९९ रुपये काढल्याचा मेसेज मोबाईलवर आला. त्यामुळे त्यांनी पतीला याबाबत विचारणा केली असता त्यांनी कुठलाही व्यवहार केला नसल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांनी बँकेच्या ग्राहक सेवा केंद्राला संपर्क साधून बँक खाते बंद केले. त्यानंतर त्यांनी घरी जाऊन पतीच्या मोबाईलची तपासणी केली असता त्यांच्या खात्यातून ९९,९९९ रुपयांसंदर्भात ओटीपी; तर पैसे काढल्याचा मेसेज आल्याचे त्यांच्या लक्षात आले; तर दुसऱ्यांदा त्यांच्या खात्यातून ९,९९९ रुपयांच्या व्यवहाराचा मेसेज आणि ओटीपी त्यांच्या पतीच्या मोबाईलवर गेल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी खारघर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com