Sat, June 3, 2023

सचिन धर्माधिकारी यांना आज डी. लिट प्रदान
सचिन धर्माधिकारी यांना आज डी. लिट प्रदान
Published on : 4 March 2023, 2:02 am
तुर्भे, ता. ४ (बातमीदार) : डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे संचालक सचिन धर्माधिकारी यांना राजस्थान येथील जगदीशप्रसाद झाबरमल टिब्रेवाला विद्यापीठातर्फे डॉक्टर ऑफ लिटरेचर पदवी (डी. लिट्.) उद्या (ता. ५) प्रदान करण्यात येणार आहे.
वाशी येथील एक्झिबिशन सेंटरमध्ये हा कार्यक्रम होणार आहे. डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे अध्यक्ष पद्मश्री महाराष्ट्रभूषण आप्पासाहेब तथा दत्तात्रय नारायण धर्माधिकारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे. या पदवीदान सोहळ्याला अनेक श्रीसदस्य, तसेच जगदीशप्रसाद झाबरमल टिब्रेवाला विद्यापीठाचे पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहणार आहेत.