
अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार
मुंबई, ता. ४ : माटुंगा बालसुधारगृहातील १० वर्षीय मुलावर सुधारगृहातीलच १४ वर्षीय मुलाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. माटुंगा पोलिसांनी या प्रकरणात पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. पीडित मुलाला त्रास होऊ लागल्यानंतर त्याने तक्रार केली असता घटना उघडकीस आली.
माटुंगा पोलिसांच्या प्राथमिक चौकशीनुसार २७ फेब्रुवारीला ही घटना घडली. बालसुधारगृहातील अधिकाऱ्यांना सुरुवातीला लैंगिक अत्याचारासंदर्भात संशय आला नाही. वेदना थांबण्यासाठी मुलाला औषधे दिली. तो सतत वेदना होत असल्याची तक्रार करत असल्याने त्याला अखेर रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी त्याची तपासणी केली असता त्याच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे आढळून आले. रुग्णालय प्रशासनाने पोलिसांना कळवल्यानंतर शुक्रवारी (ता. ३) माटुंगा पोलिस ठाण्यात पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.