पोलिस भरतीतील १० उमेदवारांविरूद्ध गुन्हा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पोलिस भरतीतील १० उमेदवारांविरूद्ध गुन्हा
पोलिस भरतीतील १० उमेदवारांविरूद्ध गुन्हा

पोलिस भरतीतील १० उमेदवारांविरूद्ध गुन्हा

sakal_logo
By

मुंबई, ता. ४ : मुंबईत पोलिस भरतीदरम्यान मैदानी चाचणीत उत्तीर्ण होण्यासाठी काही उमेदवार तंत्रज्ञानाचा वापर करत असल्याचे आढळले आहे. याप्रकरणी पवई पोलिस ठाण्यात आतापर्यंत १० उमेदवारांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. हे सर्व उमेदवार मरोळ येथील भरती केंद्रातील मैदानी चाचणीसाठी आलेले उमेदवार आहेत. या प्रकरणात दोन उमेदवारांविरुद्ध ३ मार्च आणि आठ उमेदवारांविरुद्ध ४ मार्चला पवई पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मुंबई पोलिसांनी सर्व उमेदवारांना भरतीदरम्यान त्यांनी निष्पक्ष आणि प्रामाणिकपणे भरती प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, फसवणूक करणारे उमेदवार केवळ प्रक्रियेतून अपात्र होणार नाही; तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा मुंबई पोलिसांनी दिला आहे.