खगोल विज्ञान प्रदर्शनातून सौरमंडलाची भ्रमंती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खगोल विज्ञान प्रदर्शनातून सौरमंडलाची भ्रमंती
खगोल विज्ञान प्रदर्शनातून सौरमंडलाची भ्रमंती

खगोल विज्ञान प्रदर्शनातून सौरमंडलाची भ्रमंती

sakal_logo
By

बोर्डी, ता. ५ (बातमीदार) : बोर्डी येथील एस. आर. सावे शिबिर निवासमध्ये खगोल विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या प्रदर्शनाचा उद्‍घाटन समारंभ आचार्य भिसे शिक्षण संस्थेचे अध्यक्ष एन. के. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. २ ते ४ मार्चपर्यंत हे प्रदर्शन अध्ययन संस्था मुंबई, मराठी विज्ञान परिषद बोर्डी शाखा आणि माजी विद्यार्थी संघ यांच्यातर्फे आयोजित करण्यात आले होते.
याप्रसंगी मराठी विज्ञान परिषदेचे कार्यवाह अ. पा. देशपांडे, अध्यक्ष ज्येष्ठराज जोशी, कार्यकारी संचालक दिलीप हेर्लेकर, घोलवडचे सरपंच रवींद्र बुजड, अध्ययन संस्थेचे अध्यक्ष भुपेंद्र मुजुमदार, अध्ययन संस्थेचे संचालक राजीव वर्तक यांनी मार्गदर्शन केले. मराठी विज्ञान परिषदेच्या अध्यक्षा ऊर्मिला करमरकर यांनी प्रदर्शन आयोजित करण्यामागील उद्देश स्पष्ट केला. तीन दिवस चाललेल्या प्रदर्शनात दोन हजार चारशे विद्यार्थी, विद्यार्थिनींनी सहभाग नोंदवला. कार्यक्रमाचा सांगता सोहळा येथील एन. बी. मेहता विज्ञान महाविद्यालयाचे उपप्राचार्य टी. एन. घोरुडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. उषा चौधरी यांनी आभार मानले.

-----------------
एकाच छताखाली संपूर्ण माहिती
खगोल विज्ञान प्रदर्शनात स्थानिक रेखावृत्त, अक्षवृत्त, सूर्यघड्याळ, काठीचा प्रयोग, ध्रुवतारा आणि स्थानिक अक्षवृत्त याचा संबंध तसेच दुर्बिणीतून सूर्यावरील डाग पाहणे, केप्लरचे नियम, चंद्राविषयीचे वस्तुमान, धूमकेतू, गुरुत्वाकर्षण कक्ष, तारे आणि ब्लॅक होल, तारे दीर्घिका व विश्व तारे-तारका समूह कॅलेंडर व आधुनिक खगोलाची सुरुवात अशी सहा दालने या प्रदर्शनात मांडण्यात आली होती. २४०० विद्यार्थ्यांनी या दालनात मांडलेल्या प्रदर्शनाचा लाभ घेतला.