पनवेलमध्ये कर वसुलीला वेग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पनवेलमध्ये कर वसुलीला वेग
पनवेलमध्ये कर वसुलीला वेग

पनवेलमध्ये कर वसुलीला वेग

sakal_logo
By

महापालिकेच्या पथकाची सिडको नोडमध्ये कारवाई
नवीन पनवेल, ता. ५ (वार्ताहर)ः मालमत्ता कराची वसुली थकल्याने पनवेल महापालिकेचे आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे महापालिकेने व्यावसायिक मालमत्ता कर धारकांकडून वसुलीसाठी पथक तयार केले असून थेट कारवाई सुरू केली आहे. त्यामुळे मालमत्ता कराच्या वसुलीला पनवेलमध्ये वेग आल्याचे चित्र आहे.
सिडको हद्दीतील ८०६ मालमत्ताधारकांना पनवेल महापालिकेने नोटिसा बजावल्या आहेत. त्यापैकी फक्त २६ मालमत्ताधारकांनी आपला मालमत्ता कर भरला आहे. त्यामुळे २० लाखांहून अधिकचा मालमत्ता कर थकल्यामुळे पनवेल महापालिकेने वसुलीसाठी कंबर कसली आहे. तसेच मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेने ४ टिम तयार केल्या असून अधिकारी, कर्मचारी, सुरक्षारक्षक असे मिळून ७-८ सदस्यांचे हे पथक महापालिकेच्या चारी प्रभागांमधील सिडको नोडमध्ये वसुली करत आहे.
--------------------------------------------------
दवंडीतून नागरिकांना आवाहन
मालमत्ता कर टाळणाऱ्यांच्या शास्तीमध्ये प्रतिमहा दोन टक्क्यांची वाढ होत असल्याने नागरिकांचा मालमत्ता कर भरण्याकडे ओढा वाढत आहे. अशातच महापालिकेकडून दवंडी पिटून कराचा भरणा करण्याविषयी मालमत्ताधारकांना आवाहन केले जाणार आहे. सिडकोच्या प्रत्येक नोडमध्ये या माध्यमातून मालमत्ता कराचा भरणा करण्यासाठी नागरिकांना सांगण्यात येणार आहे.