भटक्या कुत्र्यांसाठी केंद्रे उभारा

भटक्या कुत्र्यांसाठी केंद्रे उभारा

मुंबई, ता. ५ ः शहरात भटक्या कुत्र्यांमुळे नागरिकांचे हाल होत असल्याच्या तक्रारींसंदर्भात भाजप आमदार अतुल भातखळकर यांच्या लक्षवेधीवर, याविषयी समिती स्थापन करण्याची हमी मंत्री राधाकृष्ण विखेपाटील यांनी विधानसभेत दिली.
शहरांमध्ये ठिकठिकाणी भटक्या कुत्र्यांचा मोठा उपद्रव आहे. मात्र यासंदर्भात शासनाचे सुस्पष्ट धोरण नाही. भटक्या कुत्र्यांसाठी केंद्रे उभी करून त्यांचा त्रास कमी करावा, अशी मागणी भातखळकर यांनी केली. याला मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सकारात्मक उत्तर देत महिन्याभरात यासंदर्भात समिती स्थापन करण्याचे आश्वासन दिले. या समितीत अधिकाऱ्यांसह या क्षेत्रात काम करणारे, एनजीओ यांचाही समावेश करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
भातखळकर यांनी भटक्या कुत्र्यांच्या त्रासाचे गांभीर्य सांगितले. भटक्या कुत्र्यांचा त्रास ज्येष्ठ नागरिक, लहान मुलांना होतो. अनेकदा कुत्र्यांनी लहान मुलांवर हल्ले केल्याच्या घटनाही घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आतापर्यंत किती कुत्र्यांचे निर्बीजीकरण झाले, याची निश्चित संख्या सरकारकडे आहे का, यासाठी एक विशेष मोहीम सरकार सुरू करणार आहे का, खासगी एनजीओची मदत घेऊन भटक्या कुत्र्यांसाठी केंद्रे उभी करण्याची मानसिकता राज्य सरकारची आहे का, असे प्रश्न भातखळकर यांनी उपस्थित केले. त्यावर मंत्र्यांनी वरीलप्रमाणे हमी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com