पालघर नगर परिषदेतर्फे महिला दिनाचे आयोजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पालघर नगर परिषदेतर्फे महिला दिनाचे आयोजन
पालघर नगर परिषदेतर्फे महिला दिनाचे आयोजन

पालघर नगर परिषदेतर्फे महिला दिनाचे आयोजन

sakal_logo
By

पालघर, ता. ५ (बातमीदार) : पालघर नगर परिषदेतर्फे बुधवारी (ता. ८) जागतिक महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास पालघर नगरपरिषद क्षेत्रातील महिलांनी सहभागी व्हावे, असे आवाहन महिला बालकल्याण समितीच्या सभापती अनुजा तरे यांनी केले आहे. पालघर नगर परिषदेच्या महिला बालकल्याण समितीतर्फे जागतिक महिला दिनानिमित्त सकाळी नऊ वाजता पालघर हुतात्मा चौक ते सोनोपंत दांडेकर मार्ग ते झुलेलाल मंदिरापर्यंत महिलांची रॅली आयोजित केली आहे. त्यानंतर महिला संरक्षणासाठी म्हणून कराटेचे प्रात्यक्षिक दाखवले जाणार आहे. कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात कार्यक्रमाचे उद्‍घाटन नगराध्यक्ष डॉ. उज्ज्वला काळे यांच्या हस्ते होणार असून या कार्यक्रमात ‘सौंदर्याची गुरुकिल्ली’ या विषयावर डॉ. मधुरा कुलकर्णी यांचे; तर ‘बदलती जीवनशैली व महिलांचे आजार’ यावर डॉ. दीप्ती गायकवाड यांचे मार्गदर्शन होणार आहे.