Mon, June 5, 2023

जीवनदीप महाविद्यालयात जीडीए अभ्यासक्रमाला सुरुवात
जीवनदीप महाविद्यालयात जीडीए अभ्यासक्रमाला सुरुवात
Published on : 5 March 2023, 11:39 am
खर्डी, ता. ५ (बातमीदार) : जीवनदीप महाविद्यालयात संस्थेचे अध्यक्ष रवींद्र घोडविंदे यांच्या संकल्पनेतून पदवीबरोबर स्किल बेस कोर्सदेखील विद्यार्थ्यांनी पूर्ण करावा, या उद्देशाने या शैक्षणिक वर्षापासून जीडीए हा वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. महाविद्यालयातील ३०० विद्यार्थ्यांनी या अभ्यासक्रमासाठी नोंदणी केली असून त्यातील पहिल्या बॅचचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य कैलास कळकटे यांच्या हस्ते करण्यात आले. या अभ्यासक्रमासाठी डॉ. वैशाली पाटील या मार्गदर्शन करणार आहेत; तर प्रा. रेश्मा घोडविंदे व प्रा. सोनम मोरे समन्वयक म्हणून जबाबदारी पार पाडणार आहेत.