अंगणवाडी सेविकांच्या वेतनवाढीसाठी प्रयत्न करणार

अंगणवाडी सेविकांच्या वेतनवाढीसाठी प्रयत्न करणार

मुरबाड, ता. ५ (बातमीदार) : कोरोना आपत्तीच्या काळात अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्त्या व मदतनीस यांनी अतुलनीय कार्य केले आहे. अंगणवाडी सेविकांचे ऋण समाजावर कायम राहतील, अशी भावना व्यक्त करून राज्यातील अंगणवाडी सेविकांना देशभरातील सर्वाधिक वेतन मिळावे यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी दिले.
कपिल पाटील फाऊंडेशनच्या वतीने मुरबाड तालुक्यातील आशा, स्वयंसेविका, मदतनीस यांचा जीवनदायिनी महिला सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील बोलत होते. या वेळी माजी आमदार गोटीराम पवार, दिगंबर विशे, कृष्णकांत तेलम, ठाणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुभाष पवार, भाजपचे तालुकाध्यक्ष जयवंत सूर्यराव, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सुभाष घरत, मधुकर मोहपे, रामभाऊ दळवी, कांतीलाल कंटे, भगवान भालेराव, दीपक खाटेघरे आदींची उपस्थिती होती.
कोरोना आपत्तीत जीवाची जोखीम पत्करून अंगणवाडी सेविकांनी कार्य केले. शिवकाळातील हिरकणीप्रमाणे कोरोनाचा कडा उतरून प्रत्येक अंगणवाडी सेविकेने घराघरांतील रुग्णांची तपासणी केली. तसेच त्यांना आवश्यक उपचारासाठी मदत केली. या काळात त्यांनी संपूर्ण सेवा ही समर्पणाच्या माध्यमातून केली, याबद्दल केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी कृतज्ञता व्यक्त केली. या वेळी दिगंबर विशे, सुभाष पवार, सुभाष घरत आदींची भाषणे झाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com