बेकायदेशीर वाहनांवर कारवाईचा बडगा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बेकायदेशीर वाहनांवर कारवाईचा बडगा
बेकायदेशीर वाहनांवर कारवाईचा बडगा

बेकायदेशीर वाहनांवर कारवाईचा बडगा

sakal_logo
By

वसई, ता. ५ (बातमीदार) : बेकायदा वाहन चालविणाऱ्या १४ रिक्षा तसेच रस्त्याला अडथळा निर्माण करणाऱ्या ५८ बसवर वाहतूक विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून ही मोहीम अशीच सुरू राहणार असल्याचे पोलिस निरीक्षक प्रशांत लांघी यांनी स्पष्ट केले.
विरार शहरात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत असते. याचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना होतो. त्यामुळे वाहतूक पोलिस निरीक्षक प्रशांत लांघी यांच्या मार्गदर्शनाखाली मोहीम हाती घेण्यात आली आहे. यात रात्रीच्या सुमारास बेकायदा रिक्षा चालविणाऱ्या १४ जणांवर कारवाई करण्यात आली. तसेच खासगी बसेस या रस्त्याच्या कडेला उभ्या केल्या जातात. या पार्क केलेल्या बसमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याने या भागात मोठी वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी विरार पूर्वेकडील मनवेलपाडा येथे अशा पार्क केलेल्या ५८ बसेसवर दंडात्मक कारवाई केली आहे. एकीकडे वाहनतळाचा अभाव त्यामुळे अनेक वाहने ही कुठेही उभी केली जातात. त्यामुळे रस्त्यावरून धावणाऱ्या वाहनांना कोंडीला सामोरे जावे लागते. या कोंडीचाफटका अत्यावश्यक सेवांनादेखील बसत असतो. त्यातच वाहतूक पोलिसांनी कारवाईची मोहीम अधिक तीव्र केल्याने वाहतूक विभागाने केलेल्या या कारवाईचे सर्वसामान्य नागरिकांतून समाधान व्यक्त केले जात आहे.
------------------------
रस्त्याच्या कडेला उभी करण्यात येणारी वाहने, तसेच बेकायदेशीर रिक्षांवर कारवाई करण्यात आली आहे. तसेच शहरातील वाहतूक सुरळीत कशी ठेवता येईल, याबाबत विविध उपाय योजना केल्या जात आहे. यानुसार पुढे देखील बेकायदेशीर वाहने आढळल्यास कारवाई केली जाईल.
- प्रशांत लांघी, पोलिस निरीक्षक
-----------------------
वसई : विरार पूर्वेला वाहतूक पोलिसांकडून बसवर कारवाई करण्यात आली.