एपीएमसीतील व्यापाऱ्याला गंडा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एपीएमसीतील व्यापाऱ्याला गंडा
एपीएमसीतील व्यापाऱ्याला गंडा

एपीएमसीतील व्यापाऱ्याला गंडा

sakal_logo
By

नवी मुंबई, ता. ५ (वार्ताहर) : दिल्लीतील एका व्यापाऱ्यासह दलालाने एपीएमसी मार्केटमधील एका मसाल्याच्या व्यापाऱ्याकडून पावणे दोन कोटींची ५० टन लवंग खरेदी करून व्यवहारातील तब्बल एक कोटी ३२ लाखांचा अपहार केल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी एपीएमसी पोलिसांनी दिल्लीतील दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणात फसवणूक झालेल्या व्यापाऱ्याचे नाव पार्थ कोठारी (वय ३४) असे असून ते एपीएमसी मार्केटमध्ये मसाल्याचा व्यापार करतात. कोठारी यांनी पाच वर्षांपूर्वी मे. पूनम स्पाईसचे मालक दिलीप मारू याच्यासोबत दोन कोटींचा मसाले खरेदी-विक्रीचा व्यवहार केला होता. त्या दोन्ही व्यवहारांचे पैसे दिलीप मारू याने कोठारी यांना दिले होते. त्यामुळे कोठारी यांचा मारूवर विश्वास बसला होता. त्यामुळे दिलीप मारू याने सुचवलेल्या दिल्ली येथील आसाम सुपारी ट्रेडर्स व महिमा इंटरनॅशनलचे अजय गुप्ता याच्यासोबत व्यवहार करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार कोठारी यांनी अजय गुप्ता याला दिलीप मारू याच्या मध्यस्थीने सुमारे पावणे दोन कोटींची ५० टन लवंग दिली होती.