Fri, June 2, 2023

पुलाच्या कठड्याला टँकरची धडक
पुलाच्या कठड्याला टँकरची धडक
Published on : 5 March 2023, 10:54 am
कासा, ता. ५ (बातमीदार) : मुंबई अहमदाबाद महामार्गावर रविवारी पहाटेच्या सुमारास सोमटा पुलावर ॲसिड घेऊन मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या टँकरचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने तो टँकर पुलाच्या कठड्याला धडकला. या अपघातामुळे टँकरचे पुढील टायर फुटले असून टँकर पुलावर अडकून बसला आहे. या अपघातात कोणतीही मनुष्यहानी झाली नाही.