धुळवडीच्या उत्साहावर विरजण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

धुळवडीच्या उत्साहावर विरजण
धुळवडीच्या उत्साहावर विरजण

धुळवडीच्या उत्साहावर विरजण

sakal_logo
By

खारघर, ता. ५ (बातमीदार) : तळोजा फेज एक वसाहतीत गेल्या काही दिवसांपासून कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. सिडकोकडे पाठपुरावा करूनही कोणत्याही प्रकारची उपाययोजना केली जात नसल्यामुळे दोन दिवसांवर आलेल्या होळी सणाच्या उत्साहावरदेखील पाणी फेरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
तळोजा वसाहतीत एमआयडीसी पाणी उपलब्ध करून दिले आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे रहिवाशांना बोअरवेलची पाणी प्यावे लागत आहे. याबाबत सिडकोकडे विचारणा केल्यास एमआयडीसीकडून कमी दाबाने पाणीपुरवठा होत असून लवकरच समस्या दूर होईल, असे सांगितले जात आहे. मात्र, सेक्टर दोन मधील रहिवासी अनेक वर्षांपासून सिडकोकडे पत्र व्यवहार आणि अधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेऊनदेखील उपाययोजना करत नसल्याने नागरिकांचे हाल होत आहे. अशातच सध्या परीक्षेचे दिवस सुरू आहे. बोअरवेलचे पाणी पिऊन मुले आजारी पडण्याची भीती आहे. त्यामुळे दुकानातून बिसलेरीचे पाणी विकत घेण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.
--------------------------------------------------
तळोजा सेक्टर दोनमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून पाणी समस्या आहे. सिडकोकडून पाणीपुरवठा होत नसल्यामुळे रहिवाशांना विहिरी आणि बोअरवेलचे पाणी प्यावे लागत आहे. त्यात दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरू आहे. बोअरवेलच्या पाण्यामुळे मुले आजारी पडतील, अशी भीती नागरिकांना वाटत असल्याने सिडकोने पाणीसमस्या कायमची सोडवावी.
- प्रमोद गायकर, सदस्य, पार्वती इन्कलू सोसायटी.