Sat, June 10, 2023

मर्चंट पतसंस्थेसाठी ७० टक्के मतदान
मर्चंट पतसंस्थेसाठी ७० टक्के मतदान
Published on : 5 March 2023, 11:28 am
जव्हार, ता. ५ (बातमीदार) : तालुक्याची अर्थवाहिनी समजल्या जाणाऱ्या मर्चंट नागरी सहकारी पतसंस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी रविवारी शहरातील ज्ञानगंगा शाळेत सकाळी आठ वाजल्यापासून ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत मतदान करण्यात आले. या वेळी ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग नागरिकांना सोयी-सुविधा उपलब्ध नसल्याचे मतदारांनी सांगितले. २२ वर्षांनंतर घेण्यात आलेल्या या निवडणुकीत ७० टक्के मतदान झाले. यात दोन हजार १५४ भागधारक असताना केवळ एक हजार ५१० भागधारकांनी मतदान करून हक्क बजावला. या निवडणुकीत १३ संचालक पदांसाठी एकूण ३० उमेदवार रिंगणात होते. त्यात दोन अपक्ष, तर जनसेवा व मर्चंट सहकार पॅनेल यांच्यात समोरासमोर लढत होती. या निवडणुकीची मतमोजणी ही मतदानाच्या ठिकाणी उशिरापर्यंत सुरू होती.