कंपनीतील कंत्राट हटवल्याने व्यवस्थापकावर हल्ला

कंपनीतील कंत्राट हटवल्याने व्यवस्थापकावर हल्ला

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ५ : डोंबिवली एमआयडीसीतील एका कंपनीतील व्यवस्थापकावर काही दिवसांपूर्वी अज्ञात व्यक्तींनी लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी कल्याण गुन्हे शाखेने सोनारपाडा येथून चौघा अट्टल गुन्हेगारांना अटक केली. व्यवस्थापकाने एका आरोपीला कंत्राट दिले होते. ते कमी करून दुसऱ्या कंत्राटदारास फर्निचरचे काम दिल्याने त्यांच्यावर हल्ला केल्याची माहिती तपासात उघड झाली.

डोंबिवली एमआयडीसीमध्ये बीईडब्ल्यू या कंपनीत सुरेंद्र मौर्या (वय ४१) हे व्यवस्थापक आहेत. १५ फेब्रुवारीला सायंकाळी कंपनीतून सुटल्यानंतर ते मोटरसायकलने घरी निघाले होते. एमआयडीसी फेज २ मधील म्हात्रे नगर परिसरात ते आले असता त्यांच्या पाठीमागून मोटरसायकलवर आलेल्या दोघांनी त्यांच्यावर लोखंडी रॉडने हल्ला केला होता. याप्रकरणी मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हे शाखा घटक ३ कल्याणचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक किशोर शिरसाट यांनी रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण करून आरोपींचा शोध घेण्याच्या सूचना केल्या. पोलिस पथकाने सापळा रचत सोनारपाडा येथून आरोपींना अटक केली.

घरी जाताना पाळत ठेवून हल्ला
संशयित आरोपी पंकज पाटील (वय ३१) याला बीईडब्ल्यू कंपनीत फर्निचरचे कंत्राट मिळाले होते. ते कमी करून इतर कंत्राटदारांना ते काम देण्यात आले होते. हा राग असल्याने पंकज व शैलेश राठोड (वय ३०) यांनी संगनमत करत सुशांत जाधव (वय २७) व महेश कांबळे (वय ३१) यांनी मौर्या हे कामावरून घरी जाताना पाळत ठेवून त्यांच्यावर हल्ला केला असल्याची कबुली दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com