बेकायदा रेती उपशाचा नागरिकांकडून उलगडा

बेकायदा रेती उपशाचा नागरिकांकडून उलगडा

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ५ : कोपर खाडीत बेकायदा रेती उपसा करणारी बाज नागरिकांनी शनिवारी (ता. ४) रात्री पकडली; मात्र अंधाराचा फायदा घेत रेतीमाफिया व आणखी एका बाजने तेथून पळ काढला, परंतु एक बोट पकडण्यात नागरिकांना यश आले. याची माहिती मिळताच नायब तहसीलदार सुषमा बांगर यांच्या पथकाने घटनास्थळी पाहणी केली. त्यानंतर रेतीसाठा जप्त करत बाज आणि सक्शन पंप नष्ट करण्यात आला.

डोंबिवली, कोपर, कल्याण खाडीत बेकायदा रेती उपसा सुरूच असून महसूल विभागाकडून वारंवार कारवाई होऊनही रेतीमाफिया चोरी करत आहेत. त्यामुळे खाडीलगत असलेल्या शेतजमिनी नापीक बनत चालल्या आहेत. कोपर खाडीत रात्रीच्या अंधारात बेकायदा रेतीउपसा सुरू असतो. शनिवारी रात्री खाडी परिसरात रेतीउपसा सुरू असल्याची बाब नागरिकांच्या लक्षात आल्याने त्यांनी घटनास्थळी धाव घेत रेतीमाफियांना अटकाव करण्याचा प्रयत्न केला. नागरिकांचा आक्रमकपणा आणि ओहोटी सुरू झाल्याने बाजसोबत आलेल्या रेतीमाफियांनी तेथून पळ काढला; तर बाज व बोट खाडीकिनारीच अडकली होती. या घटनेची माहिती आज (ता. ५) सकाळी पोलिस आणि महसूल विभागास मिळाली. महसूल विभागाच्या नायब तहसीलदार बांगर आणि त्यांच्या पथकाने रेती उपसा करणारा सक्शन पंप, बाज कापल्यानंतर पेटवून दिला. या कारवाईत १२ लाखांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आल्याची माहिती महसूल विभागाकडून देण्यात आली. याप्रकरणी तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगत आरोपींवर कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी माहिती बांगर यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com