मेगाब्लॉकमधील लोकल रखडपट्टीचा फटका!

मेगाब्लॉकमधील लोकल रखडपट्टीचा फटका!

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. ५ : होळी आणि धुळवड उत्सवाचा शेवटचा रविवार असल्याने नागरिकांनी खरेदीचा बेत आखला होता; मात्र यासाठी बाहेर पडलेल्या नागरिकांना मेगाब्लॉकचा फटका बसला. मध्य रेल्वेच्या ठाणे ते कल्याण मार्गावर पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेवर; तर हार्बर मार्गावरील कुर्ला ते वाशी मार्गावर रेल्वेने मेगाब्लॉक घेतला होता; परंतु आधीच अपुरी लोकल संख्या आणि लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेसमुळे कसारा-कर्जत मार्गावरून उशिराने धावणाऱ्या लोकलने प्रवाशांची फलाटावर तासन् तास लटकंती झाली.

मध्य रेल्वेने रविवारी ठाणे ते कल्याण अप आणि डाऊन पाचव्या-सहाव्या मार्गिकेवर सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत मेगाब्लॉक घेतला होता. त्यामुळे जलद मार्गावरील लोकल फेऱ्यां‍वर परिणाम झाला. या काळात लोकल सुमारे २५ ते ३० मिनिटे उशिराने धावत असल्याने प्रवासी बेहाल झाले होते; तर हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी स्थानकांदरम्यान ब्लॉकमुळे अप आणि डाऊन दोन्ही मार्गावरील लोकल फेऱ्‍या रद्द होत्या. यामुळे हार्बर मार्गावरील प्रवाशांनी पर्यायी मार्गाने प्रवास करण्याला पसंती दिली.

प्रवाशांच्या सोयीसाठी सीएसएमटी-कुर्ला आणि पनवेल-वाशी या भागांत विशेष लोकल चालविण्यात आल्या होत्या; परंतु लोकल अर्धा-अर्धा तासाने असल्याने प्रवाशांना गर्दीचा सामना करावा लागला. ब्लॉक संपल्यानंतरही मध्य आणि हार्बर मार्गावरील लोकलमध्ये गर्दीचे प्रमाण अधिक असल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. विशेष म्हणजे दादर, कुर्ला आणि ठाणे रेल्वे स्थानकावर प्रवाशांची गर्दी दिसून आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com