मुंबई-गुवाहाटी ‘वन वे’ विशेष एक्स्प्रेस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबई-गुवाहाटी ‘वन वे’ विशेष एक्स्प्रेस
मुंबई-गुवाहाटी ‘वन वे’ विशेष एक्स्प्रेस

मुंबई-गुवाहाटी ‘वन वे’ विशेष एक्स्प्रेस

sakal_logo
By

मुंबई, ता. ५ : मध्य रेल्वेने प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मुंबई ते गुवाहाटी ‘वन वे’ विशेष एक्स्प्रेस चालविण्याचा निर्णय घेतला आहे. ट्रेन क्र. ०१४९२ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथून ७ मार्च रोजी रात्री १२.३० वाजता सुटेल आणि गुवाहाटी येथे तिसऱ्या दिवशी पहाटे ५.३० वाजता पोहोचेल. या एक्स्प्रेसला दादर, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, भुसावळ, इटारसी, जबलपूर, सतना, माणिकपूर, प्रयागराज छिवकी, पं. दीनदयाळ उपाध्याय जंक्शन, बक्सर, आरा, दानापूर, पटना, बख्तियारपूर, मोकामा, लक्कीसराय, किउल, जमालपूर, भागलपूर, न्यू फरक्का, मालदा टाऊन, न्यू जलपाईगुडी, न्यू कूचबिहार, न्यू अलीपूरद्वार, न्यू बोंगाईगाव आणि रंगिया आदी स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे.