पश्चिम रेल्वेवर अतिरिक्त होळी स्पेशल एक्स्प्रेस

पश्चिम रेल्वेवर अतिरिक्त होळी स्पेशल एक्स्प्रेस

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. ५ : सणासुदीच्या काळात रेल्वे प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेने साबरमती-ओखा आणि भावनगर-वांद्रे टर्मिनस-अहमदाबाद दरम्यान अतिरिक्त होळी विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. ट्रेन क्र. ०९४५३ साबरमती-ओखा सुपरफास्ट एक्स्प्रेस ६ आणि ८ मार्चला साबरमतीहून रात्री ११.३५ वाजता सुटेल. ट्रेन क्र. ०९४५४ ओखा-साबरमती एक्स्प्रेस ७ आणि ९ मार्चला ओखा येथून रात्री ११.४५ वाजता सुटेल. ट्रेन क्र. ०९२०६ भावनगर - वांद्रे (टी) वन वे स्पेशल एस्क्प्रेस ६ मार्च रोजी भावनगरहून सायंकाळी ५.४५ वाजता, ट्रेन क्र. ०९२०५ वांद्रे टर्मिनस-अहमदाबाद सुपरफास्ट एक्स्प्रेस ७ मार्च रोजी वांद्रे टर्मिनसहून सकाळी ११.१५ वाजता निघेल. या रेल्वे गाड्यांचे आरक्षण भारतीय रेल्वेच्या सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि आयआरसीटीसीच्या संकेस्थळांवर सुरू झाले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com