‘सकाळ सन्मान’ सोहळा शनिवारी ‘झी टॉकीज’वर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘सकाळ सन्मान’ सोहळा शनिवारी ‘झी टॉकीज’वर
‘सकाळ सन्मान’ सोहळा शनिवारी ‘झी टॉकीज’वर

‘सकाळ सन्मान’ सोहळा शनिवारी ‘झी टॉकीज’वर

sakal_logo
By

मुंबई, ता. ५ : ‘सकाळ’ मुंबई आवृत्तीच्या ५२ व्या वर्धापन दिनानिमित्त विविध क्षेत्रांतील सेवाव्रती संस्था आणि व्यक्तींना ‘सकाळ सन्मान’ पुरस्कार देऊन गौरवण्यात आले होते. विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या उपस्थितीत प्रभादेवीतील रवींद्र नाट्यमंदिरात हा सोहळा दिमाखात पार पडला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत रंगलेल्या या सोहळ्याचे प्रक्षेपण शनिवारी (११ मार्चला) सायंकाळी ७ वाजता ‘झी टॉकीज’ वाहिनीवर होणार आहे.
विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, राज्यसभेचे खासदार प्रफुल्ल पटेल, उद्योगमंत्री उदय सामंत, पर्यटन, महिला व बालकल्याण विकास मंत्री मंगलप्रभात लोढा आदी मान्यवरांची उपस्थिती या सोहळ्यास लाभली होती. मनोरंजन विश्वातील तारे-तारकांनी कलाविष्कार सादर केले. अभिनेत्री भूमी पेडणेकर, वाणी कपूर, मानुषी छिल्लर, अमृता खानविलकर आणि अभिनेता सोनू सूद यांच्यासह विविध क्षेत्रांतील सेवाव्रती संस्था व व्यक्तींचा सत्कारमूर्तींत समावेश होता. अभिनेत्री पूजा सावंत, मृण्मयी देशपांडे, भार्गवी चिरमुले, शिवानी रांगोळे, अभिनेता आदिनाथ कोठारे, विराजस कुलकर्णी व अंकित मोहन यांचा नृत्याविष्कार आणि विनोदवीरांच्या विनोदाच्या फोडणीने कार्यक्रमात धमाल आणली. शाहीर रामानंद उगले आणि त्यांच्या पथकाने सादर केलेल्या पोवाड्याने कार्यक्रमाची सांगता झाली. अभिनेत्री अश्विनी भावे, मृणाल कुलकर्णी, गायक स्वप्नील बांदोडकर, गायिका सावनी रवींद्र, निर्माती कांचन अधिकारी आणि दिग्दर्शक अभिजीत पानसे कार्यक्रमास उपस्थित होते. हा अनुपमेय असा सोहळा रसिकांना घरबसल्या पाहता येणार आहे.