कांदिवलीत श्रावस्ती बौध्द विहार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कांदिवलीत श्रावस्ती बौध्द विहार
कांदिवलीत श्रावस्ती बौध्द विहार

कांदिवलीत श्रावस्ती बौध्द विहार

sakal_logo
By

कांदिवली, ता. ७ (बातमीदार) ः आमदार योगेश सागर यांच्या विकास निधीतून बनवण्यात आलेल्या श्रावस्ती बौद्ध विहाराचे उद्‌घाटन कर्मवीर पद्मश्री दादा इदाते यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी खासदार गोपाळ शेट्टी, भाजप नेते आमदार विजय (भाई) गिरकर, मंडळ अध्यक्ष दीपक तावडे आदी मान्‍यवरांसह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. बौद्ध पंचायत समिती शाखा क्रमांक ५५० चे पदाधिकारी भाऊ पवार यांनी श्रावस्ती बौद्ध विहारासाठी पत्रव्यवहार करून पाठपुरावा केला होता. आमदार योगेश सागर यांनी विकास निधीतून प्रशस्त बौद्ध विहार निर्माण केले. या विभागातील समस्या, नागरिकांची गैरसोय विचारात घेऊन बौद्ध विहाराच्या वर अभ्यासिका बांधली आहे; तसेच विहारात बुद्धांची मूर्ती बसवण्यात आली आहे. यामुळे ‘श्रावस्ती बौद्ध विहार’ सामाजिक शैक्षणिक दृष्ट्या स्थानिकांना उपयोगी होणार आहे, असे मत भाऊ पवार यांनी व्यक्त केले.